मोहोळ तालुक्‍यातील सात गावे हॉटस्पॉटच्या दिशेने ! सर्व्हेसाठी 376 पथके

मोहोळ तालुक्‍यातील सात गावे हॉटस्पॉटच्या दिशेने
Corona
CoronaMedia Gallery

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुक्‍यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वरचेवर वाढत असून आजपर्यंत 31 हजार रॅपिड ऍटिजेन तर 15 हजार आरटीपीसीआर चाचण्या झाल्या आहेत. सात गावांची हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल सुरू असून सर्व्हेसाठी एकूण 376 पथके तैनात केल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण पाथरुटकर यांनी दिली.

गेल्या महिन्याभरापासून तालुक्‍यातील प्रत्येक गावात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. याला नागरिकांचा निष्काळजीपणा व कोरोनाचे नियम न पाळणे ही एकमेव कारणे आहेत. सध्या तालुक्‍यात 251 बाधित असून 161 जणावर उपचार सुरू आहेत, तर 90 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तालुक्‍यात एकूण 15 हजार 310 आरटीपीसीआर चाचण्या झाल्या आहेत तर 31हजार रॅपिड टेस्ट झाल्या आहेत. त्यापैकी आरटीपीसीआर चाचण्यांत 746 तर अँटिजेनमध्ये 1 हजार 254 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

शहरात 29 जणांचा तर ग्रामीणमध्ये 83 जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्‍यात आतापर्यंत 9 हजार 85 जणांचे लसीकरण झाले असून, त्यात शहरातील 5 हजार 12 तर ग्रामीणमधील 4 हजार 76 जणांचा समावेश आहे. तालुक्‍यातील नजीक पिंपरी, कृषी विज्ञान केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी कोव्हिड सेंटर सुरू केले असून त्यांची तीनशे रुग्णांची क्षमता आहे. भविष्यात रुग्णांची संख्या वाढली तर शहरापासून जवळच असलेल्या बीपीएड कॉलेजमध्ये नियोजन करण्यात येणार आहे.

तालुक्‍यातील मृत्यूचे प्रमाणही वाढते आहे. त्यात शहराचा मृत्यूदर 6.50 तर ग्रामीणचा 4.17 एवढा आहे. सरासरी मृत्यूदर 4.7 एवढा आहे. पॉझिटिव्ह येण्याचा शहराचा दर 7.57 तर ग्रामीणचा 4.31 एवढा आहे. सरासरी दर 5.4 आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता शेटफळ येथील रुग्णालयात 100 खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. वाढती रुग्णांची संख्या पाहता तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सहकार्यासाठी समन्वयक म्हणून डॉ. विनोद अभिवंत यांची नेमणूक केली आहे.

दरम्यान, तालुक्‍यातील आष्टी, पेनूर, खंडाळी, पोखरापूर, सौंदणे, शेटफळ व मोहोळ शहर यांची हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालयात एखाद्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याला कोव्हिड सेंटरपर्यंत सोडण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाकडे स्वतःची रुग्णवाहिका नाही. गेल्या दोन वर्षांपासून याचा पाठपुरावा सुरू आहे. डॉ. पी. पी. गायकवाड यांनी यासाठी राजीनामाही दिला होता, मात्र अद्यापही रुग्णवाहिका मिळाली नाही, हे शहरवासीयांचे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल .

बातमीदार : राजुकमार शहा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com