esakal | आडत व्यापाऱ्यांचा शुक्रवारी बंद ! डाळीच्या साठ्यावरील निर्बंधास विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

 Solapur Adat Bajar

आडत व्यापाऱ्यांचा शुक्रवारी बंद! डाळीच्या साठ्यावरील निर्बंधास विरोध

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

शहरातील आडत व्यापारी संघाच्या वतीने केंद्र शासनाने डाळीच्या साठ्याबाबत काढलेल्या आदेशाच्या विरोधात शुक्रवारी (ता. 16) एकदिवसीय बंद पुकारण्यात आला आहे.

सोलापूर : केंद्र शासनाने मूग वगळता इतर डाळींच्या (Pulses) साठ्याबाबत नुकतेच आदेश काढून हा साठा मर्यादित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. डाळ मिलवाल्यांसाठी क्षमतेच्या 25 टक्केच किंवा मागील तीन महिन्यांचा उत्पादनाच्या बरोबर साठा (जे जास्त असेल ते) करण्याची परवानगी दिली आहे. या कायद्यातून मूगाला वगळले आहे. हा नियम 31 ऑक्‍टोबर 2021 पर्यंत लागू राहणार आहे. शहरातील आडत व्यापारी संघाच्या वतीने केंद्र शासनाने डाळीच्या साठ्याबाबत काढलेल्या आदेशाच्या विरोधात शुक्रवारी (ता. 16) एकदिवसीय बंद पुकारण्यात आला आहे. (Traders to observe strike on Friday in protest of ban on stockpiling of pulses-ssd73)

हेही वाचा: वाहनचालकांनो, वाहतूक कोंडीवर निघाला तोडगा!

एकाच प्रकारच्या डाळी 100 मेट्रिक टनपेक्षा जास्त साठवून ठेवता येणार नाही. या आदेशात ग्रामीण व शहरासाठी वेगवेगळा साठा मर्यादेचा उल्लेख नाही. कोणाकडे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त साठा असेल तर त्यांनी त्यांचा साठा तीस दिवसांच्या आत कमी करावा. किरकोळ व्यापारी 5 मेट्रिक टन (50 क्विंटल) पेक्षा जास्त साठा तर ठोक व्यापारी 200 मेटन (2000 क्विंटल) पेक्षा जास्त डाळींचा साठा ठेवू शकणार नाहीत. दरम्यान, या संदर्भात आडत व्यापारी संघटनेची बैठक अध्यक्ष प्रभाकर विभूते यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी संघाचे उपाध्यक्ष सुरेश चिकळ्ळी, सेक्रेटरी मोहन कोकांटी, खजिनदार गुरुशांत ढगे, संचालक बसवराज इटकळे व संचालक उपस्थित होते. वरिष्ठ व्यापारी संघटना (Senior Merchant Association) व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स (Maharashtra Chamber of Commerce) व फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स (Federation of Association of Traders) या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचे आवाहन केले. त्यानुसार शुक्रवारी (ता. 16) बंद पुकारला आहे.

हेही वाचा: दुसऱ्या डोससाठीही मिळेना लस ! 29 लाख व्यक्‍तींना लस नाहीच

केंद्राने डाळीच्या साठा मर्यादेबद्दल आदेश काढल्याने अडचण झाली आहे. हा आदेश अन्यायकारक आहे. त्यामुळे आम्ही एक दिवसाचा बंद पाळून शासनाला आमचा विरोध कळवण्याचे ठरवले आहे.

- प्रभाकर विभूते, अध्यक्ष, आडत व्यापारी संघ, सोलापूर

loading image