Solapur Navratri procession to be celebrated with traditional instruments under heavy police security.
sakal
सोलापूर: नवरात्रोत्सव सांगता मिरवणूक आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उद्या (गुरुवारी) शहरात विविध मंडळांकडून मिरवणुका काढल्या जाणार आहेत. लेझिम, ढोल-ताशांच्या गजरात या मिरवणुका काढल्या जाणार आहेत. डीजेमुक्त सोलापूर कृती समिती, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स असोसिएशन व शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मिरवणुकांमध्ये ‘डीजे’वर निर्बंध घालण्यात आले आहेत.