Devotees worship Lord Shiva and Goddess Parvati during Hartalika Teej vrat, seeking marital bliss and family prosperity.Sakal
सोलापूर
Greenery Special: दीर्घायुष्य, कौटुंबिक सुखासाठी महिलांचे हरितालिका व्रत; शिव-पार्वतीची उपासना; महाराष्ट्रासह कर्नाटक, उत्तर भारतात प्रथा
Hartalika vrat observed with devotion: भारतीय स्त्रिया ही कुटुंबाच्या कल्याणासाठी निष्ठेने उपवास, व्रत आणि पूजा करते, ही परंपरा प्राचीन काळापासून आहे. हरितालिका या नावातच व्रताचा उगम दडलेला आहे. ‘हरि’ म्हणजे भगवान शंकर तर ‘तालिका’ म्हणजे सखी.
सोलापूर : भाद्रपद शुक्ल तृतीया म्हणजेच हरितालिका व्रत सौभाग्य, पतीपरायणता आणि आध्यात्मिक श्रद्धेचे प्रतीक मानलं जाते. या दिवशी महिलावर्ग शिव-पार्वतीची उपासना करतात आणि अखंड सौभाग्य, दीर्घायुष्य व कौटुंबिक सुखासाठी प्रार्थना करतात. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश तसेच उत्तर भारतात लाखो स्त्रिया हे व्रत करतात.

