
बार्शी : बळेवाडी (ता. बार्शी) येथील शेतकरी बळिराम बलभीम पोकळे (वय ५७) यांनी शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बार्शी तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. चुलतभाऊ राजेंद्र रामराव पोकळे (वय ५३, रा. बळेवाडी) यांनी पोलिसांत माहिती दिली.