
Crop Loss Pushes Two Farmers to Suicide in Solapur District
Sakal
पांगरी: अतिवृष्टीमुळे शेतातील काढणीला आलेल्या सोयाबीन व अन्य पिकांचे नुकसान झाले. ‘डोक्यावरील बॅंकेचे कर्ज कसे फेडू, मुलांचे शिक्षण कसे करू’ या विवंचनेतून बार्शी तालुक्यातील कारी व दहिटणे या गावातील शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शरद भागवत गंभीर (वय ३९, रा. कारी) व लक्ष्मण काशीनाथ गावसाने (वय ४२, रा. दहिटणे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.