

MIDC Police Intervene After Fatal JCB Accident in Solapur
Sakal
सोलापूर: विमानतळाच्या आतील पेट्रोलपंपाजवळील गेट मोठे करण्याचे काम स्थानिक कंत्राटदारातर्फे सुरू होते. बुधवारी (ता. २८) नेहमीप्रमाणे निशांत राजू सरवदे (वय २६, रा. सिद्धार्थ नगर, कुमठे) हा त्याठिकाणी कामाला गेला होता. काम करत असताना जेसीबीच्या बकेटमधील सिमेंटचा मोठा दगड त्याच्या डोक्यात पडला आणि निशांत गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जवळील खासगी रुग्णालयात नेले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. यात अपघाती मृत्यू म्हणून एमआयडीसी पोलिसांत नोंद झाली आहे.