govind barge
sakal
वैराग (जि. सोलापूर) - प्रेयसी असलेल्या नर्तकीला भेटायला आलेल्या लुखामसला (ता. गेवराई) गावच्या माजी उपसरपंचाने सासुरे (ता. बार्शी) येथील तिच्याच घरासमोर कारमध्ये डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. भेटायला येऊनही तिने कॉल न उचलल्याने त्याने जीवन संपविले. गोविंद जगन्नाथ बर्गे (वय ३४) असे मृताचे नाव आहे. त्याच्या मेहुण्याच्या फिर्यादीवरून संशयित नर्तकीविरुद्ध वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला.