
टेंभुर्णी : कन्हेरगाव (ता. माढा) येथे शेतात ट्रॅक्टरचा रोटर मारताना पाय अडकून पायाचा चेंदामेंदा झाला. यावेळी मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव व वेदना सहन न झाल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. २३) दुपारी तीनच्या सुमारास कन्हेरगाव येथील डोकेवस्ती येथे घडली. याबाबत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.