

Tamalwadi toll plaza accident: Speeding car crashes into pole, killing two and injuring two others.
Sakal
उ. सोलापूर : भरधाव निघालेल्या कारने टोल नाक्यावरील खांबाला जोरदार धडक दिली. या घडलेल्या अपघातामुळे कार मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चालकासह इतर एक जण गंभीर जखमी झाला. मंगळवारी मध्यरात्री एक वाजता तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोलनाक्यावर ही घटना घडली. मृत व जखमी हे मार्डी येथील रहिवासी आहेत.