
Scene from Sangola accident site where a motorcycle collision left one dead and three injured.
सांगोला : सांगोल्यातील चिंचोली रोडवरील ब्रम्हओढ्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना ५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. मृत व्यक्तीचे नाव चंद्रकांत नारायण गोडसे (वय ५१, रा. चिंचोली रोड, बुरांडेवस्ती, सांगोला) असे असून, ते मजुरीच्या कामासाठी जात असताना हा अपघात झाला.