जिल्ह्यातील ९८० झेडपी शिक्षकांच्या जानेवारीत बदल्या! ५ वर्षे पूर्ण झालेल्यांची बदली पुन्हा

झेडपी शिक्षकांना बदली प्रक्रिया अंतिम झाल्यानंतर मधूनच सध्याची शाळा सोडावी लागणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील ९८० शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत. जानेवारीअखेरीस त्यांची बदली होणार आहे.
schools
schoolssakal

सोलापूर : यंदा प्रथमच आंतरजिल्हा व जिल्ह्याअंतर्गत बदल्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ऑनलाईन होत आहेत. झेडपी शिक्षकांना बदली प्रक्रिया अंतिम झाल्यानंतर मधूनच सध्याची शाळा सोडावी लागणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील ९८० शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत. जानेवारीअखेरीस त्यांची बदली होणार आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा आहेत. त्याअंतर्गत जवळपास नऊ हजार २०० शिक्षक कार्यरत आहेत. आंतरजिल्हा बदल्यानंतर आता जिल्हाअंतर्गत बदल्या होत आहेत. उद्या (शनिवारी) जिल्ह्याअंतर्गत बदल्यांसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. दिव्यांग, ५३ वर्षांवरील शिक्षक, विधवा, परितक्त्या अशा शिक्षकांची गणना संवर्ग- एकमध्ये होते. जिल्ह्यातील ८६३ शिक्षक संवर्ग-एकमधून बदलीसाठी पात्र आहेत. तर पती-पत्नी एकत्रिकरण निकषांनुसार ११७ शिक्षक बदलीसाठी पात्र आहेत. दोघांच्या शाळांमधील अंतर ३० किलोमीटरपेक्षा अधिक असावे, अशी अट आहे. तसेच संवर्ग-तीनमध्ये दुर्गम भागातील आणि संवर्ग-चारमध्ये एकाच शाळेत पाच वर्षे काम करणाऱ्या शिक्षकांचा समावेश होतो. जानेवारीअखेरीस संवर्ग एक- दोन आणि तीनमधील शिक्षकांच्या बदल्या होतील. त्यानंतर संवर्ग-चारमधील शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. ऑनलाइन बदली प्रक्रियेमुळे यंदा शिक्षकांच्या बदल्यांसाठी खूपच विलंब झाला आहे. त्यामुळे बदल्या झाल्या, तरी शिक्षक नवीन शाळेवर तत्काळ जातील की नाही, हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे सहा-सात महिने विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक अचानक बदलल्याने त्यांची मानसिकता काय होईल, असाही प्रश्न आहे.

सर्वसाधारण बदल्या जानेवारीनंतर

आंतरजिल्हा बदल्यानंतर आता जिल्ह्याअंतर्गत शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरु असून बदलीसाठी पात्र शिक्षकांनी अर्ज करण्यासाठी उद्या (शनिवार) शेवटची मुदत आहे. त्यानंतर एकाच शाळेवर पाच वर्षे काम केलेल्या शिक्षकांच्या बदल्या होतील. बदली प्रक्रियेनंतर सर्वच शाळांमध्ये विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक उपलब्ध होतील.

- संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

फेब्रुवारीत बदलीचा शेवटचा टप्पा

दरवर्षी शिक्षकांच्या ऑफलाईन बदल्यांची प्रक्रिया मे-जूनमध्ये होते. पण, यंदा ऑनलाईन बदल्यांमुळे शाळा सुरु होऊन सहा महिने होऊनही जिल्ह्याअंतर्गत बदल्या झालेल्या नाहीत. दुसरीकडे आंतरजिल्हा बदल्या होऊनही अनेकजण रुजू झालेले नाहीत, हे विशेष. बदल्यांचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे नाहीत. त्यामुळे सध्या काही शाळांमध्ये विद्यार्थी अधिक आणि शिक्षक कमी तर काही ठिकाणी विशेषत: शहरी हद्दवाढ भागातील झेडपीच्या शाळांमध्ये विद्यार्थी खूपच कमी आणि शिक्षक जास्त, अशी स्थिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com