

Rural Power Outage in Malshiras Taluka; Residents Suffer Amid Prolonged Blackout
sakal
नातेपुते : एक ट्रान्सफार्मर बिघडला म्हणून दुसऱ्या ट्रान्सफार्मवरला त्या गावांचे कनेक्शन जोडले. वाढलेल्या कनेक्शनमुळे तोही ट्रान्सफार्मर बिघडला. ट्रान्सफार्मर सुरू करण्यासाठी रोज ४ बॅरल ऑईलची गरज आहे. महावितरणकडे ऑईलच नसल्याने माळशिरस तालुक्यातील १० गावे अंधारात आहेत. चार दिवसांपर्यंत सुरू असलेला सिंगल फेजचा विजपुरवठाही बंद झाला आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील दहा गावांतील लाखाहून अधिक ग्रामस्थांना १० दिवसांपासून अंधारात राहावे लागत असून, ५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने विद्युतपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.