तुळजाभवानी मातेचा गोंधळ प्रथमच हिंदीत! मध्य प्रदेश येथे होणार सादरीकरण | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुळजाभवानी मातेचा गोंधळ प्रथमच हिंदीत! मध्य प्रदेश येथे होणार सादरीकरण
तुळजाभवानी मातेचा गोंधळ प्रथमच हिंदीत! मध्य प्रदेश येथे होणार सादरीकरण

तुळजाभवानी मातेचा गोंधळ प्रथमच हिंदीत! मध्य प्रदेशात होणार सादरीकरण

नातेपुते (सोलापूर) : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा (Tulja Bhavani) गोंधळ प्रथमच हिंदीत सादर केला जात आहे. या गोंधळाचे सादरीकरण मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जनजातीय लोककला संग्रहालय एवं बोलीविकास अकादमी, भोपाळ (Bhopal) येथील सांस्कृतिक रंगमंचावर रविवारी (ता. 14) रोजी होणार असल्याची माहिती भटक्‍या विमुक्त समाजाचे अभ्यासक सूर्यकांत भिसे (Suryakant Bhise) यांनी दिली.

हेही वाचा: तरच होईल पंतप्रधानांच्या अपेक्षेप्रमाणे स्वच्छ पंढरपूर तीर्थक्षेत्र!

श्री. भिसे यांनी सांगितले की, देशभरातील भटक्‍या विमुक्त जाती जमाती व त्यांची लोककला या विषयावर भारत सरकारच्या जनजातीय लोककला संग्रहालय एवं बोलीविकास अकादमीच्या माध्यमातून अभ्यास केला जातो. भटक्‍या विमुक्त समाजावर तसेच त्यांचे रीती, रिवाज, संस्कृती, लोककला, शिल्पकला आदी विषयांवर अभ्यास करण्यासाठी देशभरातील अभ्यासक येतात. या समाजावर संशोधन करतात व शोधनिबंध सादर करतात. भटक्‍या विमुक्तांच्या लोककला व लोकसंस्कृतीचे सादरीकरण करण्यासाठी देशभरातील लोककलाकारांना येथे आमंत्रित केले जाते. देशभरातून आलेल्या अभ्यासकांना त्यांचे सादरीकरण कळावे यासाठी ते हिंदीमधून केले जाते.

हेही वाचा: शंकरराव मोहिते बॅंकेच्या व्यवस्थापकांनी केली फेरलेखापरीक्षणाची मागणी

राज्यातील राजाराम कदम (परभणी), केशवराव बडगे, (पुणे), बनसिद्ध भिसे (उमदी, जि. सांगली), धोंडीराम माने (सोलापूर), राजेंद्र गायकवाड (तुळजापूर), सुभाष गोरे (सांगोला, जि. सोलापूर), कालिदास सोनवणे (पंढरपूर, जि. सोलापूर) आदी कलाकारांनी मराठी व कन्नड भाषेतून आपली गोंधळी कला देशात व देशाबाहेर सादर केली आहे. आता ही लोककला प्रथमच हिंदीतून सादर होत आहे आणि हा सादरीकरणाचा मान अमरावती जिल्ह्यातील रवींद्र आव्हाडकर व बैतुल मध्य प्रदेश येथील लक्ष्मण आव्हाडकर या गोंधळी समाजातील लोककलावंतांच्या पार्टीला मिळत आहे. रविवारी (ता. 14) सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.

loading image
go to top