
Tuljabhavani VIP Darshan Pass Rates Increased from September 20
Esakal
शारदीय नवरात्रोत्सव अवघ्या १० दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे. दरम्यान, तुळजाभवानी देवीच्या व्हीआयपी दर्शनाच्या पासच्या किंमतीत वाढ करण्यात आलीय. व्हीआयपी दर्शन पासच्या दरात वाढ करण्याच्या निर्णयाची माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानने दिली आहे. व्हीआयपी पासचे नवे दर २० सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहेत. ऐन नवरात्रोत्सवाच्या आधी ही दरवाढ झाल्याने भाविकांना व्हीआयपी दर्शनासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.