सोलापूर शहरातील हिरवाईची उलाढाल एक कोटी रुपयांवर

vruksh lagwad.jpg
vruksh lagwad.jpg
Updated on

सोलापूरः शहरातील हिरवाई म्हणजे वृक्ष लागवडीची आर्थिक उलाढाल 1 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या क्षेत्रामधून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 1 हजार लोकांना रोजगार मिळू लागला आहे. वृक्ष रोप विक्री, इमारत परिसरातील ग्रिनरी, उद्याने व वैयक्तीक बागांची देखभाल यातून हा रोजगार मिळतो आहे. 

मागील काही वर्षात शहरामध्ये या वृक्ष लागवडीच्या क्षेत्राचा सातत्याने विस्तार होत आहे. सोलापूर महानगर असले तरी अद्यापही अपार्टमेंट संस्कृती इतर महानगरांच्या तुलनेत फारशी वाढली नाही. भुखंड खरेदी करून घराचे बांधकाम करणाऱ्या रहिवाशांचे प्रमाण अधिक आहे. भुखंडावर उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागांवर परसबाग, भाजीपाला उत्पादन, किचन गार्डन, टेरेस गार्डन, ऑक्‍सिजन कॉर्नर, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पावसाळा लागला की वृक्षांची रोपटी लावणासाठी नागरिकांची लगबग सूरू होते. शहरामध्ये वनीकरण खात्याच्या रोपवाटिकांनी देखील सातत्याने वनेतर क्षेत्रामध्ये मोठ्या रिकाम्या जागा, शासकीय कार्यालयाचे परिसर आदी ठिकाणी झाडे लावण्याचे काम सुरू झाले आहे. एमआयडीसी उद्योगांकडून देखील वृक्ष लागवडीला मोठीच चालना मिळालेली आहे. 

निसर्गप्रेमी नागरिकांनी चालवलेल्या चळवळीमुळे सर्व सामान्यांमध्ये वृक्ष लागवडीबाबतची जागरुकता मोठ्या प्रमाणात झाली आहे. अनेक पर्यावरण प्रेमी गट, समुह व चळवळी या क्षेत्रात किचन गार्डन पासून ते जंगल लागवडीपर्यंत उपक्रमांची मोठी भर घालत आहेत. या शिवाय एकूण सात खासगी नर्सरीमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष रोपटी उपलब्ध असतात. आंध्रप्रदेश, कोलकत्ता, बेंगलोर, पुणे, तामिळनाडू आदी भागातून ही रोपटी आणली जातात. त्यामध्ये अनेक औषधी झाडे, फुल झाडे, फळझाडे, शोभीवंत झाडे, अशा कितीतरी झाडांची विक्री होत असते. दरवर्षी पावसाळ्यात या विक्री होणाऱ्या झाडांची संख्या हजारोंच्या घरात असते. 
इमारतीच्या परिसरातील बागांच्या देखभालीची कंत्राटे देखील दिले जातात. यामध्ये अनेक लोकांना रोजगार मिळतो आहे. तसेच शहरातमध्ये मनपाची उद्याने देखील आहेत. या उद्यानांमध्ये झाडांची देखभाल करणारे कामगार देखील आहेत. वृक्ष रोपट्यांची खरेदी, विक्री व वाहतूकीमध्ये अनेक लोकांना रोजगार मिळत आहे. खासगी मालकीच्या बागा, हॉटेल व्यावसायिकांच्या विकसित केलेल्या बागा व नविन गृहसंकुलामधील बागांच्या देखभालीसाठी रोजगार उपलब्ध होतो आहे. 
शहरातील जंगले ही नविन संकल्पना सोलापूरमध्ये रूजू लागली आहे. मनपाने काही ठिकाण मियावाकी पध्दतीची जंगले विकसित करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे सोलापूरातील हिरवाई चळवळीला हा एक नवीन प्रयोग जोडला जात आहे. 


जागरूकतेमुळे वाढता प्रतिसाद 
सध्या अन्य राज्यातून वृक्ष रोपटी मोठ्या प्रमाणात येत असतात. महाराष्ट्रातून आंब्याची रोपटी व काही फुलझाडांची रोपे उपलब्ध होतात. वाढत्या प्रतिसादामूळे रोजगारांच्या संधी वाढत आहेत. 
- सिध्देश्‍वर बरबडे, संचालक निसर्ग नर्सरी. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Political Strategy Meets Personal Bond: Deshmukh Joins Raut’s Campaign Drive
Behind-the-Scenes Power Play Returns as Council Election Equations Shift
solapur
Hydro-Crisis Resolved: Ujani Canal Water Finally Injected into Man River Bed
Marathi News Esakal
www.esakal.com