esakal | Solapur | जुळे सोलापूरला हवे स्वतंत्र बसस्थानक
sakal

बोलून बातमी शोधा

 बसस्थानक.

सोलापूर : जुळे सोलापूरला हवे स्वतंत्र बसस्थानक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जुळे सोलापूर भागात एक लाखापेक्षा अधिक लोकवस्ती आहे. या लोकवस्तीतील नागरिकांना एसटी प्रवासासाठी सुमारे आठ ते दहा किलोमीटरवरील मुख्य बस स्थानकावर जावे लागते. यामुळे रिक्षा भाड्याचा मोठा भुर्दंड येथील नागरिकांना बसत आहे. जुळे सोलापुरात बस स्थानक झाल्यास शहरातील वाहतुकीवरील ताणही कमी होईल.

अनेक वर्षापासून परिवहन खात्याने शहराची वेगाने होणारी वाढ लक्षात घेऊन यापूर्वीच दुसऱ्या बस स्थानकाचा विचार करणे आवश्‍यक होते. इतर सर्व मोठ्या शहरात दोन ते चार बस थांबे केलेले आहेत. या थांब्यावर सर्वच मार्गावरील गाड्या नेल्या जातात. अगदी कमी लोकसंख्येच्या शहरात देखील आता अनेक बसथांबे झालेले आहेत. पण अद्याप सोलापुरात त्याबाबत नियोजन झाले नाही. त्याचा त्रास सर्वाधिक जुळे सोलापूरच्या प्रवाशांना होतो. अंतर जास्त असल्याने रिक्षाला भाडे अधिक द्यावे लागते.

शेअरींगमध्ये ॲटोचालक न्यायला तयार नसतात. अनेक वेळा तर एसटी भाड्यापेक्षा अधिक रक्कम ॲटोचालकाला द्यावी लागते. रात्रीच्या वेळी बाहेरगावावरून परत आलेल्या जुळे सोलापूर भागातील प्रवाशांना तर कितीतरी अधिक रक्कम मोजावी लागते. या सर्व प्रकाराने जुळे सोलापूरकर त्रस्त आहेत. कुमठ्याच्या बस थांब्यावर फक्त निवडक मार्गावरील एसटी थांबतात. प्रत्यक्ष जुळे सोलापुरातून जाणाऱ्या नागरिकांची पुणे येथे सर्वाधिक कनेक्‍टीव्हीटी आहे. इतर सर्वच मार्गावरील बसगाड्या जुळे सोलापुरात ये-जा करण्यासाठी उपलब्ध करणे गरजेचे आहे. याशिवाय महापालिकेच्या वतीने सिटीबस सेवा देखील उपलब्ध नाही.

हेही वाचा: बार्शीत दरोडा! नवीन ट्रॅक्‍टर-ट्रॉलीसह 15 लाखांचा ऐवज लंपास

मुख्य बाजारात सतत या भागातील नागरिक व महिलांची ये-जा सुरू असते. पण सिटीबस सेवा नसल्याने खरेदीला जाण्यासाठी प्रत्येक नागरिकाला दुचाकी वापरून पेट्रोलचा खर्च करावा लागतो. प्रत्यक्षात मधला मारुतीसह रेल्वेस्थानक, बसस्थानक यासह सर्वच भागात सिटीबस उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. आजुबाजूच्या खेड्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी सोलापूरला ये-जा करतात. त्यांनाही सिटीबस आवश्‍यक आहे.

रस्ते चांगले नाहीत. सिटीबस सेवा मिळत नाहीत. तसेच घंटागाडी देखील कचरा संकलनासाठी सकाळी लवकर येणे आवश्‍यक असताना येत नाही. अनेक अडचणी जुळे सोलापुरात निर्माण झाल्या आहेत.

- भूषण काळे, जुळे सोलापूर

जुळे सोलापूरसाठी स्वतंत्र बस स्थानकाची आवश्‍यकता आहे. कुमठा नाका बसस्थानक देखील बंद आहे. त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होत आहे. येथे सर्व बसगाड्या थांबण्याची सोय करावी.

- समर्थ घोडके, जुळे सोलापूर

loading image
go to top