अडीच लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही सन्मान निधी! 3१ ऑगस्ट करा ‘ई-केवायसी’

जिल्ह्यातील दोन लाख ४८ हजार शेतकऱ्यांनी ती प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही. त्यामुळे ३१ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी न केल्यास त्या शेतकऱ्यांना सप्टेंबरमधील दोन हजारांचा हप्ता मिळणार नाही.
pm kisaan sanman yojana
pm kisaan sanman yojanaesakal

सोलापूर : जिल्ह्यातील सहा लाख सहा हजार ६११ शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी पात्र आहेत. पण, त्या शेतकऱ्यांना ज्या बॅंक खात्यात सन्मान निधीचा हप्ता जमा होतो, त्याची ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दोन लाख ४८ हजार शेतकऱ्यांनी ती प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही. त्यामुळे ३१ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी न केल्यास त्या शेतकऱ्यांना सप्टेंबरमधील दोन हजारांचा हप्ता मिळणार नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षातून तीनवेळा प्रत्येकी दोन हजार रुपये मिळतात. लाभार्थींमध्ये आयकरदाते, सरकारी नोकदार तथा निकषांनुसार जे अपात्र आहेत, त्यांनीही योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे केंद्र सरकारने आता प्रत्येक लाभार्थीला ई-केवायसी करणे बंधनकारक केले. कृषी विभाग व महसूलच्या माध्यमातून गावोगावी मेळावेदेखील झाले. पण, केवळ सात हजार ८७३ जणांनीच ती प्रक्रिया पूर्ण केली. आता ई-केवायसी करण्यासाठी दोन दिवसांची मुदत शिल्लक आहे. सन्मान निधी मिळणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने ई-केवायसी करणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीत अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर व सांगोला या तालुक्यांतील प्रत्येकी २४ ते ३३ हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील प्रत्येकी १८ ते १९ हजार शेतकरी या प्रक्रियेपासून दूर आहेत. उत्तर सोलापुरातील आठ हजार ४५६ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्यांना सन्मान निधीचा पुढील हप्ता मिळणार नाही. www.pmkisan.gov.in या पोर्टलवरील ‘फार्मर कॉर्नर’वर क्लिक करून शेतकऱ्यांना ई-केवायसी स्वत:च्या मोबाईलवरून घरबसल्या करता येते. गावोगावी आपले सरकार सेवा केंद्रे असून त्याअंतर्गत बायोमेट्रिकद्वारे देखील ही प्रक्रिया करता येते. त्यासाठी १५ रुपयांचा खर्च आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

सन्मान निधीची सद्य:स्थिती

  • एकूण पात्र शेतकरी

  • ६,०६,६११

  • ई-केवायसी केलेले शेतकरी

  • ३,५०,७५०

  • ई-केवायसी न केलेले शेतकरी

  • २,४७,९८८

  • दरवेळी मिळणारा हप्ता

  • २,०००

मोबाईलवरूनही करता येईल ई-केवायसी

शेतकऱ्यांनी दोन दिवसांत ई-केवायसी करून घ्यावे, अन्यथा त्यांना पुढील महिन्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता मिळणार नाही. ई-केवायसीची प्रक्रिया मोबाईलवरून घरबसल्याही करता येते. तसेच गावातील आपले सरकार सेवा केंद्रावर देखील तशी सोय आहे.

- बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com