पोटच्या मुलांकडूनच वडिलांची तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक

मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
फसवणूक
फसवणूकSakal

मोहोळ - दोन सख्या भावांनी संगनमताने आपल्याच वडिलांच्या बचत खात्यातील एटीएमचा वापर करून तब्बल दोन लाख रुपये परस्पर काढून फसवल्याचा प्रकार ता 31 मे रोजी उघडकीस आला. जगन्नाथ भुजंगा कोकरे (रा. गोटेवाडी ता. मोहोळ) अशी फसवणूक झालेल्या पित्याचे तर सागर जगन्नाथ कोकरे, सचिन जगन्नाथ कोकरे (रा. गोटेवाडी) असे फसवणूक करणाऱ्या पुत्रांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, जगन्नाथ भुजंगा कोकरे, वय 52 वर्षे (रा. गोटेवाडी, ता. मोहोळ) हे शेतकरी असून मोहोळ येथील भारतीय स्टेट बँकेत त्यांचे बचत खाते आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी बँकेकडून एटीएम कार्ड घेतले असून त्याचा कधीही वापर केलेला नव्हता. त्यांच्या बँक खात्यामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम होती. ता 31 मे रोजी सकाळी 11 वाजता ते मोहोळ येथील भारतीय स्टेट बँकेतील बचत खात्यावरील दोन लाख रुपये काढण्यासाठी गेले होते.

यावेळी बँक अधिकाऱ्यांनी त्यांच्या खात्यावर केवळ 643 रुपये शिल्लक असल्याचे सांगितल्याने त्यांना धक्काच बसला. अधिक चौकशी केली असता, एटीएम कार्डचा वापर करून दोन लाख रुपये काढले गेले असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. त्यानंतर जगन्नाथ कोकरे यांना त्यांच्या दोन मुलांनी संगणमत करून परस्पर एटीएम कार्ड चालू करून त्याच्या आधारे एटीएम मधून वेळोवेळी दोन लाख रुपये काढून घेतले असल्याचे लक्षात आले.

या प्रकरणी जगन्नाथ कोकरे यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादी नुसार सागर जगन्नाथ कोकरे, सचिन जगन्नाथ कोकरे (रा. गोटेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल शरद ढावरे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com