Solapur Accident:'कार आणि एसटीच्या धडकेत आटपाडीचे दोघे ठार; वाटंबरे येथे दुर्घटना, चालकांचे नियंत्रण सुटलं अन्..
Shocking Road Mishap: रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकावरुन कार पलटी होत वेगात दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या एसटी बसला जोराची धडक दिली. यात कारमधील राहुल ऐवळे व संदेश हेगडे या दोघांचाही मृत्यू झाला. तर एसटी बस मधील चालकासह काही प्रवासीही जखमी झाले आहे. या अपघातात एसटी बसचे ही मोठे नुकसान झाले आहे.
सांगोला : भरधाव वेगात येणाऱ्या कारने एसटीला दिलेल्या धडकेत आटपाडी तालुक्यातील दोघा तरुण मित्रांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार (ता. २१) रोजी सायंकाळच्या सुमारास सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील मान नदीच्या पुलाजवळ घडली.