Fatal Hit-and-Run: जाधववाडी येथील बंडू चव्हाण व गणेश शिंदे दोन मजूर आज (सोमवार) सकाळी आठच्या सुमारास कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून टेंभुर्णीकडे चालले होते. त्यांच्या गाडीला परिते (ता. माढा) हद्दीतील हॉटेल सौरभजवळ अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.
करकंब : टेंभुर्णी- पंढरपूर रोडवर झालेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत जाधववाडी (ता. पंढरपूर) येथील दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. बंडू पोपट चव्हाण (वय ३६) व गणेश लक्ष्मण शिंदे (वय ३३) अशी मृतांची नावे आहेत.