Motivation News : दुचाक्यांच्या फुटरेस्ट संशोधनावर पेटंट घेऊन दोन तरुणांनी उभारला उद्योग

स्कूटर प्रकारातील दुचाक्यांवरील फुटरेस्टला पायाने चालू बंद करण्याचे नवे रुप देणाऱ्या येथील इंजिनिअर किरण कलशेट्टी व अमित टेळे यांनी संशोधनाचे पेटंट करून उद्योग उभारला.
kiran kalshetti and amit tele
kiran kalshetti and amit telesakal

सोलापूर - स्कूटर प्रकारातील दुचाक्यांवरील फुटरेस्टला पायाने चालू बंद करण्याचे नवे रुप देणाऱ्या येथील इंजिनिअर किरण कलशेट्टी व अमित टेळे यांनी संशोधनाचे पेटंट करून उद्योग उभारला. भारत सरकारने या स्टार्टअपची दखल घेत त्यांना धोरणात्मक मदत देण्याचे काम केले. आता हे संशोधित ‘फुटरेस्ट’ बाजारात उपलब्ध झाले आहेत. सध्या रस्त्यावर धावणाऱ्या दुचाक्यांना ते सहज बसवण्याइतके सोपे तंत्र उपलब्ध केले आहे.

किरण कलशेट्टी हे ॲटोमोटिव्ह इंजिनिअर आहेत. चेन्नई येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते सोलापुरात परतले. तर अमित टेळे हे देखील इंजिनिअर असून अनेक मोठ्या उद्योग समूहात त्यांनी काम केले. हे दोघे सोलापुरात एकत्र आले व त्यांनी संशोधनास सुरवात केली.

यादरम्यान त्यांना स्कूटर प्रकारच्या वाहनातील पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या फुटरेस्टचा प्रश्न लक्षात आला. त्यावर संशोधन त्यांनी सुरु केले. त्यांनी फुटरेस्टचे नवे डिझाईन निश्चित करून त्याचे पेटंट मंजूर करून घेतले. त्यानंतर त्यांनी नव्या दुचाक्या व सध्या रस्त्यावर धावणाऱ्या या दुचाक्यांसाठी हा संशोधित फुटरेस्ट बसवता येईल, या पद्धतीने हे संशोधन केले.

kiran kalshetti and amit tele
Digital Technology : डिजिटल तंत्रज्ञानामुळे शिक्षणात सुलभता - पंतप्रधान नरेंद्र मोदी

नव्या फुटरेस्टमध्ये केवळ पायाच्या दाबाने हा फुटरेस्ट उघडला जातो. तसेच नंतर तो उतरताना पायानेच बंद करता येतो. त्यांचे संशोधन पेटंट बाजारात आल्यानंतर अनेक दुचाकी निर्मिती क्षेत्रातील उद्योग समूहांनी त्यांना संशोधित फुटरेस्ट उपलब्ध करून देण्यासाठी चर्चेला पाचारण केले.

मोटोव्हर्स उद्योग समूहाची स्थापना करून त्यांनी त्याचे स्टार्टअप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या उद्यम इनक्युबेशन सेंटरकडे दिले. दरम्यानच्या काळात त्यांनी आसरा चौकात फॅक्टरीची उभारणी केली. तब्बल पावणे दोन कोटींची गुंतवणूक करत उद्योग उभारणीचे काम सुरु झाले.

केंद्र सरकारने त्यांच्या स्टार्टअपची नोंदणी करून त्याची क्षमता १०० कोटीच्या मुल्याकनांचे असल्याचे निश्चित करून दिले. मागील दोन महिन्यापासून संशोधित फुटरेस्टची उत्पादने त्यांनी बाजारात आणली आहेत.

kiran kalshetti and amit tele
Sachin Burse : इचलकरंजीच्या धावपट्टूची रन'वारी'; 100 किलो मिटर धावण्याचा उपक्रम

काही ठळक बाबी

- स्कूटर प्रकारातील दुचाक्यावरील फुटरेस्टवर संशोधन

- ॲटो प्रकारचे फुटरेस्टची निर्मिती

- महिला, वृध्द व लहान मुलांना फुटरेस्ट संशोधित नसल्याने त्रास

- केवळ पायाने फुटरेस्ट चालू व बंद करणे शक्य

- एकूण ॲटोमोबाईलमधील ॲसेसरीजमधील १६ उत्पादने निर्मितीचे नियोजन

- दुचाक्यांमधील दुर्लक्षित स्पेअरपार्टमध्ये नवी संशोधने

- अनेक दुचाकी निर्मिती समुहांकडून चर्चेसाठी पाचारण

मागील दोन महिन्यापासून संशोधित फुटरेस्ट आपण बाजारात आणली आहेत. त्याचा ग्राहकांना मोठा लाभ होत आहे. पुढील उत्पादनांची निर्मितीसाठी व उद्योग वाढीसाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.

- किरण कलशेट्टी, संस्थापक, मोटोव्हर्स उद्योग समूह

दुचाक्याच्या ॲसेसरीजवर फुटरेस्टच्या माध्यमातून संशोधन सुरु आहे. लवकरच इतर उत्पादने बाजारात आणण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे.

- अमित टेळे, सहसंस्थापक, मोटोव्हर्स उद्योग समूह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com