सोलापूर : यु टर्न ठरला जीवघेणा; तीन ठार

स्कॉर्पिओ झाडावर आदळून अपघात; एकजण गंभीर
accident
accident Sakal

सोलापूर : मंडप, डेकोरेटर व जनरेटरचे भाडे आणायला जाताना औराद-तेरामैल (वकिल वस्ती) रस्त्यावरील झाडावर स्कॉर्पिओ (Scorpio)आदळून झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. औरादकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ’यु’ टर्नचा (U turn) चालकाला अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याची माहिती मंद्रूप पोलिस ठाण्याचे (Mandrup Police Station)सहायक पोलिस निरीक्षक नितीन थेटे यांनी दिली. अपघाताची नोंद मंद्रूप पोलिस ठाण्यात झाली आहे.घटनेची हकीकत अशी, सोलापुरातील सळई मारुती, उत्तर सदर बझार परिसरातील किशोर अण्णाराव भोसले, निराळे वस्तीतील नितीन भगवान भांगे, मोदीतील व्यंकटेश राम म्हेत्रे आणि राकेश हुच्चे या चौघांचा मंडप, डेकोरेटर व जनरेटर भाड्याने देण्याचा व्यवसाय होता.

accident
लस न घेतलेले काहीजण म्हणतात..! मी मटन, अंडी खातो, मद्यपान करतो

ते चौघेही शनिवारी (ता. १५) मागील कार्यक्रमातील भाडे आणायला स्कॉर्पिओ वाहनातून औरादकडे जात होते.चालकासाठी रस्ता अनोळखीच होता, तरीही वाहनाचा वेग जास्त होता. रस्त्यालगत गर्द झाडी होती, पुढे येणाऱ्या ’यु’ टर्नचा चालकाला अंदाज नव्हता. चालकाला अचानक रस्त्याचा टर्न दिसला आणि गाडीचा वेग जास्त असल्याने स्कॉर्पिओ वळविण्याच्या प्रयत्ना ती झाडावर जोरात आदळली. एकातएक झाड असल्याने अपघातानंतर गाडीचा चक्‍काचूर झाला आणि गाडी उलटली. रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांना गाडी दिसली, परंतु गाडीत कोणीच नाही असे समजून ते जात होते. थोड्या वेळाने काहीजण त्याठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रात्री साडेअकराच्या सुमारास मंद्रूप पोलिसांना माहिती दिली. पोलिस ठाण्यातून सहायक पोलिस निरीक्षक थेटे यांना कॉल गेला आणि १५ मिनिटात ते घटनास्थळी दाखल झाले. जखमीला त्यांनी पहिल्यांदा बाहेर काढून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले आणि त्याला वेळेत उपचार मिळाले.(Solapur News)

accident
कुरुंदा येथे 'कोरोना' वाढल्याने आजपासून तीन दिवसाचा लॉकडाऊन

करीमुळे रस्त्यावर वाहने नव्हती

मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कर असते. त्यामुळे त्या परिसरातून ये-जा करणारी टॅक्‍ट्रर वाहतूक बंद होती. त्यामुळे त्या स्कॉर्पिओ चालकाला अनोळखी रस्त्याचा अंदाज आला नाही. दरम्यान, त्याच ठिकाणी तीनवेळा अपघात होऊन वाहने पलटी झाली आहेत. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर गाडीतील तिघांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे किशोर भोसले, नितीन भांगे व व्यंकटेश म्हेत्रे या तिघांचा जागीच मृत्यू झाला होता.

जेसीबीची वाट न पाहता तोडला दरवाजा

अपघातस्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर त्यांनी औरादमधून जेसीबी मागविला, परंतु त्याला वेळ लागत होता. स्कॉर्पिओवर चढल्यानंतर चालकाच्या मागील सिटवर एका जखमीची हालचाल जाणवली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक थेटे यांनी जेसीबीची वाट न पाहता गावकऱ्यांच्या मदतीने स्कॉर्पिओचा दरवाजा तोडून काढला आणि जखमीला बाहेर काढले. त्याच्या कपाळावर गंभीर जखम झाली होती, डोक्‍यातून रक्‍त येत होते. अपघात होऊन खूप वेळ झाला असल्याने प्रसंगावधान साधून त्याला वेळेत रुग्णालयात दाखल केल्यास तो वाचू शकतो म्हणून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com