
“Ubatha crows meet turns political; Jyoti Waghmare slams Sanjay Raut for mortgaging Shiv Sena.”
Sakal
सोलापूर : उबाठा गटाकडे सध्या एका विमानात बसतील एवढेच कार्यकर्ते शिल्लक आहेत. संजय राऊतांनी शिवसेनेचा धनुष्यबाण सोनिया गांधीच्या पायात गहाण टाकला होता. त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा धाडसी निर्णय घेत हिंदुत्ववादी विचारांची शिवसेना वाचवण्याचे काम केले. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे हिंदुत्ववादी विचारांचा, मावळ्यांचा दसरा असेल. उबाठाचा मेळावा म्हणजे कावळ्यांचा हसरा मेळावा असेल, अशी टीका शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.