
सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यामुळे शिवसेना फुटल्याचा आरोप मंत्री भरत गोगावले यांनी केला होता. त्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाच्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात मंत्री भरत गोगावले यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केले.