

Solapur Ujani Dam Gets 165000 Crore Investment Proposal For AI Data Centre Floating Solar Green Hydrogen And Nuclear Power
sakal
-विठ्ठल सुतार
सोलापूर: उजनी धरणाच्या परिसरात सीड (SEED) प्रकल्पाच्या माध्यमातून १ लाख ६५ हजार १५४ कोटींच्या गुंतवणुकीचा करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकार, जेडब्ल्यू ग्लोबल आणि द सीड कॉर्सोटिअम पार्टनर्स यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला आहे. या करारातून उजनी धरण परिसरात सौरऊर्जा, ‘एआय’ डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन आणि स्मॉल मॉड्यूलर रिॲक्टर हे चार मोठे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात धरणातील पाण्यावर ३ हजार हेक्टरवर तरंगता सौरऊर्जा प्रकल्प व ‘एआय’ डेटा सेंटर असणार आहे. याबाबत धरण परिसरातील जलसंपदा विभागाची ४०० एकर जमीन उद्योग विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.