

Ujani Dam Water Dispute Karnataka Demands Seven TMC Amid Drought as Maharashtra Reviews Solapur Water Planning on October 30
sakal
सोलापूर: पुढील पावसाळा आठ महिन्यांवर असताना उजनी धरणातील पाण्याच्या नियोजनाचे आव्हान उभे राहिले आहे. धरणात सध्या एकूण १०३ टीएमसी पाणीसाठा असून, भीमा नदीत पाणी सोडले जात असल्याने ऑक्टोबरअखेर साठ्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कर्नाटक सरकारने राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उजनीतून सात टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेता धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मागणीवर राज्य शासन काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.