Ujani Dam Water Release : आषाढी यात्रा काळात पंढरपूरला येणाऱ्या 18 ते 20 लाख भाविकांना पूराचा त्रास होऊ नये यासाठी आज उजनी धरणातून सायंकाळी 5 वाजता 10,000 क्युसेक विसर्गानं भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली. पुणे परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यानं पंढरपूरवर पुराची टांगती तलवार ऐन यात्रा कालावधीत राहणार होती. यावर तोडगा म्हणून आता उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला आहे.