
सोलापूर : मे अखेर उणे पातळीत असलेले उजनी धरण सध्या १०५.५९ टक्के भरले आहे. जूनमधील पावसाने उजनीतील पाण्याची आवक वाढली आणि २० जूनपासून धरणातून भीमा नदी, कालव्यातून पाणी सोडणे सुरू झाले. तेव्हापासून २ सप्टेंबरपर्यंत उजनीतून तब्बल ११७ टीएमसी म्हणजेच आणखी एक उजनी पूर्ण क्षमतेने भरले असते, इतके पाणी सोडण्यात आले आहे.