
सोलापूर : सध्या दौंडवरून उजनी धरणात १४ हजार ६०० क्युसेकची आवक सुरू असून आठ दिवसांत धरण १०० टक्के होईल, अशी स्थिती आहे. आषाढीमुळे धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी बंद करण्यात आले आहे. मात्र, पावसाळा आणखी तीन महिने असल्याने सोमवारी (ता. ७) रात्रीपासून उजनीतून नदीत पाणी सोडले जाणार आहे. सध्या पंढरीत वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्याने उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर टाकण्यात आला आहे.