
नरखेड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय उमेश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उमेश पाटील यांच्या नियुक्तीने राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल सात महिन्यांनंतर नवा कॅप्टन मिळाला आहे. या निवडीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पक्ष कार्यालयात देण्यात आले. मात्र, दुसरीकडे उमेश पाटील यांच्या नियुक्तीने सोलापूरच्या राष्ट्रवादीमध्ये वादळ उठण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे.