
सोलापूर : शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना वाढीव मोबदला पाहिजे असेल तर आम्ही त्यांची बाजू सरकारपुढे नक्की मांडू. शक्तिपीठच नाही तर सोलापूर ते पुणे हा महामार्ग देखील सुसज्ज झाला पाहिजे. शक्तिपीठला आमचा पाठिंबा आहे. ज्यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लुटली त्यांच्या मुलांना/नातवांना आता या बँकेत यायचे आहे. शैलेश कोतमिरे व कुंदन भोळे यांच्या प्रशासकीय काळात चांगले कामकाज सुरू आहे. बँकेची निवडणूक नको, बँकेवर प्रशासकच हवा, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.