

The damaged two-wheeler at the accident spot on Tembhurni–Karmala road after the fatal pickup collision.
Sakal
टेंभुर्णी : टेंभुर्णी - करमाळा रस्त्यावरील अकोलेखुर्द हद्दीतील शिवराज हॉटेल जवळ भरधाव पिकअप टेम्पोने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. दुचाकीवरील मामा-भाचा गंभीर जखमी होऊन ठार झाले. हा अपघात शनिवारी सायंकाळी पावणेसहावाजण्याच्या सुमारास झाला. अपघातील दोघेही मृत हे पंढरपूर तालुक्यातील भोसे (करकंब) गावातील रानमळा भागातील होते. शनि शिंगणापूर येथून देवदर्शन घेऊन गावाकडे परतत असताना हा अपघात झाला.