

Barshi Forest Drama: Hunters Share Chilling Experience After Tiger Sighting
Sakal
सोलापूर : कोरफळे (ता. बार्शी) येथे दोन दिवसांपूर्वी आढळलेला वाघ सर्वात प्रथम तेथील शिकाऱ्यांनाच दिसला होता. बंदी असतानाही अद्यापही जिल्ह्यात अनेक ठिकाणी जाळे, वाघर याचा वापर करून शिकारी केल्या जातात. हरणांच्या शिकारीसाठी लावलेले हे जाळे (वागर) वाघाच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी वेळीच सतर्क राहून शिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.