
-प्रभुलिंग वारशेट्टी
सोलापूर : नागपंचमीला नागदेवतेचे पूजन व मंगळागौर मोठ्या उत्साहाने महिला साजरा करतात. परंतु, या परंपरेसोबतच सोलापुरात कुंचीकोरवे समाजात नागपंचमी सणाला तुलगीतुरा (संगीताचा कार्यक्रम) व तरुणांच्या लिंबूफेक स्पर्धा घेऊन हा उत्सव साजरा करतात. दरवर्षी या फेरीनिमित्त इतर ठिकाणी असलेले समाज बांधव नागपंचमीला एकत्र येतात.