विद्यापीठाची परीक्षा २० जूनपासून! ऑफलाइन परीक्षेत प्रश्न असणार वर्णनात्मक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने परीक्षेच्या वेळापत्रकात तिसऱ्यांदा बदल केला आहे. पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा आता २० जूनपासून घेण्याचा निर्णय झाला आहे.
exam offline
exam offlineesakal

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने परीक्षेच्या वेळापत्रकात तिसऱ्यांदा बदल केला आहे. पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा आता २० जूनपासून घेण्याचा निर्णय झाला आहे. ही परीक्षा ऑफलाइन पध्दतीने आणि प्रश्नपत्रिका वर्णनात्मक प्रश्नांचीच असेल, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

exam offline
तुकाराम मुंढेंची आजही सोलापूरकर काढता आठवण! सोलापूर जिल्हा टॅंकरमुक्तच

शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आणि विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार, अभ्यास मंडळाच्या रचनेनुसार प्रश्नपत्रिका असतील. परीक्षा विभागाकडून पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विषयांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यानुसार शहरात २४ तर ग्रामीणमध्ये ४७ परीक्षा केंद्रे आहेत. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे एकूण ७० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सम सत्राच्या या परीक्षा आहेत. सुरुवातीला रिपिटर विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर अंतिम वर्षाच्या आणि शेवटी प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील. २० जून ते ७ ऑगस्ट या काळात ही परीक्षा पार पडेल. कोरोना काळात सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्याने विद्यार्थ्यांच्या लिखाणाची सवय कमी झाली. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून एका तासाला पंधरा मिनिटे अधिकचा वेळ विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी दिला जाणार आहे. कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षांचे ठोस नियोजन झाले आहे. विद्यार्थ्यांची क्षमता सिध्द करून पुढे त्यांना नोकरी किंवा पुढील शिक्षणासाठी अडचणी येणार नाहीत, यादृष्टीने विद्यापीठाचे प्रयत्न आहेत.

exam offline
पुरुषांपेक्षा महिलांची कोरोनाशी यशस्वी फाईट! ८६ हजार ७२७ महिलांची कोरोनावर मात

अफवांवर विश्वास ठेवू नका
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. २० जूनपासून ऑफलाईन डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनेच या परीक्षा सुरू होतील. मात्र, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांनी ही परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित असावी, अशी मागणी केली आहे. पण, विद्यापीठाने त्यान कोणताही बदल केलेला नाही. अफवांवर विद्यार्थ्यांनी विश्वास न ठेवता परीक्षेची तयारी करावी. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरच विद्यार्थ्यांना अधिकृत माहिती कळेल, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com