
तुकाराम मुंढेंची आजही सोलापूरकर काढता आठवण! सोलापूर जिल्हा टॅंकरमुक्तच
सोलापूर : सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यांतील दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी उजनी धरण वरदान ठरले आहे. पण, पावसाळा लांबल्याने २०१८-१९ पासून सलग तीन वर्षे धरणातील मृतसाठ्यातून पाणी सोडावे लागले होते. सध्या धरणातील जिवंतसाठा संपला असून धरणात आता ६३ टीएमसीपर्यंत मृत पाणीसाठा असून धरणात १४ टीएमसीपर्यंत गाळ आहे. विशेष बाब म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सोलापूर जिल्हा टॅंकरमुक्तीसाठी पुढाकार घेतला आणि आजही जिल्हा टॅंकरमुक्तच आहे.
हेही वाचा: महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला
जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या ठोस नियोजनामुळे यंदा पावसाळ्यापर्यंत धरण प्लसमध्येच होते. ७ जूनपासून पावसाला सुरवात होऊ शकते, असा अंदाज होता. पण, पाऊस अजूनही लांबलेलाच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून सोलापूर शहराला काही दिवसांत पिण्यासाठी पाणी सोडावे लागणार आहे. जून महिन्यात पाऊस नाही झाल्यास शेतीसाठीही एक आवर्तन सोडावे लागणार आहे. आता सर्वांच्या नजरा आभाळाकडे असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. उजनी धरणातून सोलापूर, नगर, पुणे या जिल्ह्यांसह लातूर व उस्मानाबाद नगरपरिषदांनाही पाणी दिले जाते. दरम्यान, आत्पकालीन परिस्थितीत धरणातील मृतसाठ्यातून ३० टीएमसीपर्यंत पाणी सोडले जाऊ शकते, अशी माहिती जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पण, तशी वेळ येणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा: ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय! १० गुंठ्यांपर्यंत जमीन खरेदी-विक्रीला परवानगी
सोलापूर जिल्हा टॅंकरमुक्तच
एकेकाळी सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक टॅंकर सुरु असायचे. पण, तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी टॅंकरमुक्तीचा संकल्प केला आणि त्यादृष्टीने ठोस उपाययोजनाही केल्या. त्यामुळे अख्खा उन्हाळा संपला, पण सोलापूर जिल्ह्यात कुठेही टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली नाही.
हेही वाचा: दारू गाळणाऱ्या हातांनी बनविला ‘बंजारा’ ब्रॅण्ड! हातभट्टी दारूमुक्तीकडे सोलापूरची वाटचाल
उजनीसंबंधी ठळक बाबी...
- २०१८-१९ मध्ये पावसाळा लांबल्याने मृतसाठ्यातून सोडले होते २७ टीएमसी पाणी
- दुष्काळजन्य स्थितीमुळे २०१५-१६ मध्ये सोडले होते धरणातील मृतसाठ्यातून ३० टीएमसी पाणी
- २०२० मध्ये साडेबारा तर २०२१ मध्ये मृतसाठ्यातील ११ टीएमसी पाणी सोडले होते
- हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यंदा सोलापूर जिल्ह्यात सरासरी ५४३ मिलिमीटर पाऊस पडू शकतो
- जूनमध्ये पावसात खंड पडू शकतो तर जुलैच्या पंधरवड्यापासून ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण चांगले असल्याचाही अंदाज
Web Title: I Still Remember Tukaram Mundhe His Solapurkar In Ujani Minus The District Is Still Tanker
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..