

Solapur Accident
मोडनिंब: सोलापूर पुणे महामार्गावर पाच कार एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. आज दुपारी चारच्या सुमारास मोडनिंब गावाजवळ हॉटेल ओंकार पॅलेस समोर हा अपघात घडला. या अपघातात आफरिन अय्युब हक्की (वय ३३ वर्षे रा.हडपसर, पुणे) ही गर्भवती महिला किरकोळ जखमी झाली. पाचही गाड्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.