RTO
RTOsakal media

लायसन नसतानाही तरूणांच्या हाती वाहने! ‘आरटीओ’कडून ९०७ जणांना ९१ लाखांचा दंड

सोलापूर आरटीओ अधिकाऱ्यांनी पंढरपूर, सोलापूर तालुका पोलिस ठाणे, बार्शी, अक्कलकोट व मंगळवेढा तालुक्याअंतर्गत कारवाया करण्यात आल्या. त्यावेळी एकोणिसशेपैकी ९०७ वाहनचालकांकडे लायसनच नसल्याची गंभीर बाब समोर आली. त्यांना प्रत्येकी १० हजारांचा दंड करण्यात आला.

सोलापूर : जिल्ह्यात रस्ते अपघात वाढल्याने ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांनी तालुकानिहाय वाहतूक निरीक्षक नेमून बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई केली. सोलापूर आरटीओ अधिकाऱ्यांनी पंढरपूर, सोलापूर तालुका पोलिस ठाणे (अपघात जास्त), बार्शी, अक्कलकोट व मंगळवेढा तालुक्याअंतर्गत कारवाया करण्यात आल्या. त्यावेळी एकोणिसशेपैकी ९०७ वाहनचालकांकडे लायसनच नसल्याची गंभीर बाब समोर आली. त्यांना प्रत्येकी १० हजारांचा दंड करण्यात आला आहे.

राज्यातील ३० टक्के अपघात कमी करण्याबाबत परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना आदेश देत ठोस उपाययोजना व कारवाया वाढवा, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार १ मार्चपासून सोलापूर ‘आरटीओ’तर्फे जिल्ह्यात कारवाया केल्या जात आहेत.

बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मंगळवेढा, दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत अपघात वाढल्याने त्यावर सर्वाधिक फोकस करण्यात आला. या मोहिमेत तीन वायुवेग पथकामार्फत कारवाई पार पडली. रस्ता सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून वेगाने वाहने चालवण्याची मानसिकता त्यावेळी पाहायला मिळाली. अपघाताची संख्या पाहता दुचाकीस्वारांचेच प्रमाण अधिक आहे.

सीटबेल्ट, हेल्मेट घालणाऱ्यांचे प्रमाण देखील अत्यल्प आहे. मोबाईलवर बोलत वाहन चालवतात, असेही अधिकाऱ्यांना दिसून आले. अशा वाहनचालकांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना डोळे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. गव्हारे व विजय तिराणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली.

२३ दिवसांत दीड कोटींचा दंड

रस्ते अपघात कमी करण्याच्या दृष्टीने आरटीओ अधिकाऱ्यांनी १ ते २३ मार्च या काळात बेशिस्तांवर कडक कारवाई केली. त्यात ९०७ विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांसह अनफिट वाहने चालवणारे ३५७, पीयुसी नसलेले २२४, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणारे १२, तीन प्रवासी बस, विनाहेल्मेट दुचाकी चालवणारे ६७९, विनासीटबेल्ट कार चालवणारे २१७, मोबाईलवर बोलत वाहन चालवणारे ५६, वाहनाचा विमा नसलेले ४९४, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणारे १८, मागील बाजूला रिफ्लेक्टर नसलेली १५७ अशा वाहनांचा समावेश आहे. आरटीओ अधिकाऱ्यांनी त्यांना तब्बल दीड कोटींचा दंड केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com