esakal | मंद्रूपसह "या' 38 गावांत यंदा गणेशोत्सव व मोहरम सार्वजनिक नाही; ग्रामस्थांनी घेतला निर्णय 
sakal

बोलून बातमी शोधा

Moharram

मंद्रूप पोलिस ठाण्याच्या हद्दीत 111 सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची स्थापना केली जात होती. मोहरमच्या 32 समित्यांमार्फत 31 डोले व 82 पंजांची स्थापना करण्यात येत होती. मात्र, या वेळी कोरोनाचा ग्रामीण भागातील वाढता संसर्ग लक्षात घेता व शासनाच्या आदेशाचे पालन करीत सर्वानुमते सार्वजनिक उत्सव साजरा न करण्याचा ठराव ग्रामपंचायतीमार्फत संबंधित पोलिस ठाण्याला देण्यात येत आहे. 

मंद्रूपसह "या' 38 गावांत यंदा गणेशोत्सव व मोहरम सार्वजनिक नाही; ग्रामस्थांनी घेतला निर्णय 

sakal_logo
By
महासिद्ध साळवे

कुसूर (सोलापूर) : कोरोनामुळे मंद्रूप पोलिस ठाण्याच्या हद्दीत यंदा सार्वजनिक गणेशोत्सव व मोहरम साजरा न करण्याचा निर्णय 38 गावांतील नागरिकांनी घेतला आहे. हा उत्सव घरातच साजरा करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मंद्रूपच्या अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे व सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन थेटे यांनी केले आहे. 

हेही वाचा : शेट्टींच्या दूध आंदोलनाचे कनेक्‍शन "मातोश्री'वर, रिमोट मात्र बारामतीत ! कोणी केली टीका? वाचा 

मंद्रूप पोलिस ठाण्याच्या हद्दीत 111 सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची स्थापना केली जात होती. मोहरमच्या 32 समित्यांमार्फत 31 डोले व 82 पंजांची स्थापना करण्यात येत होती. मात्र, या वेळी कोरोनाचा ग्रामीण भागातील वाढता संसर्ग लक्षात घेता व शासनाच्या आदेशाचे पालन करीत सर्वानुमते सार्वजनिक उत्सव साजरा न करण्याचा ठराव ग्रामपंचायतीमार्फत संबंधित पोलिस ठाण्याला देण्यात येत आहे. 

हेही वाचा : खुषखबर..! कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी राज्यात आजपासून "इतके' इम्युनिटी क्‍लिनिक दिमतीला 

अप्पर तहसीलदार सोरटे म्हणाल्या, ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशात गणेशोत्सव व मोहरम सण येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या उत्सवाबाबत आदेश काढले आहेत. त्याचे पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे. यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाला बंदी आहे. विसर्जन मिरवणूक होणार नाही. टाकळी, वडकबाळ येथे भीमा नदी व तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन कोणी करू नये. गणेश मूर्ती विक्री व पूजेच्या साहित्याचे स्टॉल सार्वजनिक ठिकाणी लावू नयेत. 

सहाय्यक पोलिस निरीक्षक थेटे म्हणाले, पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव व मोहरम साजरा न करण्याची तयारी ग्रामस्थांनी दाखवली आहे. मोहरममध्ये पंजांची मिरवणूक असते. पण, या वेळी गणेशोत्सव व पंजांची मिरवणूक न काढण्याची तयारी नागरिकांनी दाखवली आहे. सर्वच गावांतील मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. काही मंडळे सामाजिक उपक्रम राबविणार आहेत. तेव्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे सर्वांच्या हिताचे आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top