

Spiritual Inclusion: Students Join Warkaris in Annual Vitthal Mahapuja Ceremony
Sakal
-राजकुमार शहा
मोहोळ : पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणीच्या शासकीय महापूजेत उपमुख्यमंत्र्या समवेत आता यंदापासून जिल्हा परिषद शाळेच्या एका विद्यार्थी व विद्यार्थिनीचा समावेश होणार असून, त्याचा प्रथम मान मोहोळ तालुक्याला मिळाला असून, पापरी व देवडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनीस मिळाला आहे. शिक्षक,पालक ग्रामस्थांतून आनंद व्यक्त होत आहे. मोहोळ तालुक्याच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.