
-भारत नागणे
पंढरपूर : श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी १५ जूनपासून नव्याने टोकन दर्शन सुविधा सुरू करण्यात आली आहे. मात्र, नव्याने सुरू करण्यात आलेल्या टोकन दर्शनाचा काळाबाजार अवघ्या नऊ दिवसांतच समोर आला आहे. यामध्ये बोगस टोकन दर्शन पास घेऊन येणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील सहा भाविकांना पकडण्यात आले असून, त्यांच्यावर पंढरपूर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.