

Online Registration Facility for Vitthal Puja Announced
Sakal
पंढरपूर: श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, महानैवेद्य सहभाग योजना इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२६ या कालावधीतील पूजांची ऑनलाइन नोंदणी करण्याची सुरवात २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरवात होणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.