विठ्ठल-रुक्‍मिणी मातेच्या दागिन्यांचे बनवणार सोन्या-चांदीच्या विटा! मंदिर समितीचा निर्णय | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी
विठ्ठल-रुक्‍मिणी मातेच्या दागिन्यांचे बनवणार सोन्या-चांदीच्या विटा! मंदिर समितीचा निर्णय

विठ्ठल-रुक्‍मिणी मातेच्या दागिन्यांचे बनवणार सोन्या-चांदीच्या विटा!

पंढरपूर (सोलापूर) : संक्रांत (Makar Sankranti) काळात 13, 14 आणि 15 जानेवारी या तीन दिवसांत श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात (Vitthal-Rukmini Temple) भाविकांची गर्दी होते. या काळात कोरोनाचे (Covid-19) नियम पाळून दर्शन चालू ठेवण्यात येणार आहे. परंतु, भाविकांना मंदिरात परंपरेनुसार वाण-वसा करता येणार नाही. श्री विठ्ठल आणि श्री रुक्‍मिणी मातेच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या 28 किलो सोन्याच्या (Gold) आणि 1 हजार 1 किलो चांदीच्या (Silver) वस्तू वितळवून त्याच्या विटा करून बॅंकेत (Bank) ठेवून मंदिर समितीच्या बॅंक खात्यावर व्याज जमा करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे, अशी माहिती श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीचे (Shri Vitthal-Rukmini Mandir Samiti) सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर (Gahininath Maharaj Ausekar) यांनी दिली. (Vitthal Rukmini Mandir Samiti will melt 28 kg gold and 1000 kg silver ornaments)

हेही वाचा: बूस्टर डोससाठी 'असा' मेसेज-कॉल आल्यास सावधान! बॅंक खाते होईल रिकामे

कोरोनाच्या सद्य:परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात संक्रांतीच्या काळात भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्याच्या अनुषंगाने आज मंदिर समितीच्या सदस्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या काळात गर्दी झाली तरी कोरोनाचे नियम पाळून जास्तीत जास्त भाविकांना मंदिरात दर्शनाला सोडण्याचा निर्णय आज घेण्यात आला. कोरोनाचे दोन डोस (Covid Vaccine) घेतलेले असणे बंधनकारक करण्यात आलेले नाही तथापि दोन डोस घेतलेल्या भाविकांनीच मंदिरात दर्शनासाठी येऊन काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

1985 पासून भाविकांनी श्री विठ्ठल आणि श्री रुक्‍मिणी मातेकडे अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या अनेक लहान मोठ्या वस्तू जमा झालेल्या आहेत. सोन्याच्या अशा वस्तूंचे वजन सुमारे 28 किलो इतके आहे. चांदीच्या वस्तूंचे वजन सुमारे 1 हजार 1 किलो इतके आहे. सोन्याच्या वस्तू वितळवून नवीन अलंकार तयार करण्याचा निर्णय समितीने घेतला होता. त्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे. हे सोने विकता येईल, या सोन्याचे नवीन दागिने करता येतील, सोने वितळवून त्याच्या विटा तयार करता येतील, या विटा बॅंकेत ठेवून त्याचे व्याज मंदिर समिती घेऊ शकेल, अशा चार पद्धतीने या सोन्याचा विनियोग करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार काही शासकीय अधिकारी, मंदिर समितीचे काही सदस्य यांच्या उपस्थितीत या सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तू वितळवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर हे सर्व सोने आणि चांदी पाच वर्षांसाठी बॅंकेत ठेवले जाणार आहे. मंदिर समितीच्या बॅंक खात्यावर त्याचे व्याज जमा होत राहील. भविष्यात मंदिर समितीने नवीन अलंकार करण्याचा निर्णय घेतला तर बॅंकेत ठेवलेल्या सोन्या- चांदीचा उपयोग केला जाणार आहे. सोन्याचे जे प्राचीन अलंकार आहेत ते तसेच ठेवले जाणार आहेत. प्राचीन अलंकारांपैकी (Ancient Ornaments) एकही अलंकार वितळवण्यात येणार नसल्याचे श्री. औसेकर यांनी स्पष्ट केले. आजच्या बैठकीप्रसंगी मंदिर समितीचे सर्व सदस्य तसेच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव (Gajanan Gurav), व्यवस्थापक बालाजी पुदलवाड (Balaji Pudalwad) उपस्थित होते.

हेही वाचा: लसीमुळे कोविडची तीव्रता कमीच! पावणेदोन लाख रुग्णांवर घरीच उपचार

श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या दर्शन रांगेसाठी स्काय वॉक आणि नवीन दर्शन मंडप बांधण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे 44 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. उद्योगपती अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांनी त्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली असून मंदिर समिती आणि शासनाकडून काही निधी या कामासाठी खर्च केला जाणार आहे. येत्या काही दिवसात आपण श्री. भोसले यांची भेट घेणार असून लवकरच या दोन्ही नियोजित कामांना सुरुवात व्हावी यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत, असे श्री. औसेकर यांनी नमूद केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top