लसीमुळे कोविडची तीव्रता कमीच! पावणेदोन लाख रुग्णांवर घरीच उपचार

व्हॅक्‍सिनमुळे कोविडची तीव्रता कमीच! पावणेदोन लाख रुग्णांवर घरीच उपचार
covid vaccine
covid vaccineSakal
Summary

ग्रामीणच्या तुलनेत शहरांमध्येच सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. राज्यात सद्य:स्थितीत सव्वादोन लाख सक्रिय रुग्ण आहेत.

सोलापूर : ग्रामीणच्या तुलनेत शहरांमध्येच सध्या कोरोनाचा (Covid-19) संसर्ग वाढत आहे. राज्यात सद्य:स्थितीत सव्वादोन लाख सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी जवळपास पावणेदोन लाख रुग्ण (85.6 टक्‍के) होम आयसोलेशनमध्ये (Home Isolation) असून डॉक्‍टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर त्यांच्याच घरी उपचार सुरू आहेत. रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारने सध्या उपचारासाठी तीन लाख 59 हजार 662 बेड्‌सची सोय केली आहे. (The severity of corona disease appears to be lower in patients who have been vaccinated)

covid vaccine
अबब! शेतकऱ्यांच्या थकबाकीवर महावितरणने लावला 1600 कोटींचा दंड-व्याज

राज्यात तिसऱ्या लाटेला सुरवात झाली असून, सद्य:स्थितीत ग्रामीणच्या तुलनेत शहरांमध्येच संसर्ग जोर धरू लागला आहे. शहरातील अनेकजण लॉकडाउनच्या (Lockdown) भीतीने गावाकडे जात असल्याने ग्रामीणमध्येही कोरोना वाढू शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), नवी मुंबई, कल्याण डोंबविली, मीरा भाईंदर, वसई विरार, पनवेल, नाशिक (Nashik), पुणे (Pune), पिंपरी- चिंचवड (Pimpri-Chinchwad), कोल्हापूर (Kolhapur), नागपूर (Nagpur) या महापालिका क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. तर औरंगाबाद (Aurangabad), लातूर (Latur), अकोला (Akola), चंद्रपूर (Chandrapur), सोलापूर (Solapur) या शहरांमध्येही हळूहळू रुग्ण वाढत आहेत. राज्यात दररोज आढळणाऱ्या रुग्णांपैकी 70 टक्‍क्‍यांहून अधिक रुग्ण त्याच शहरांमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राज्यातील सर्वच ठिकाणचे ऑक्‍सिजन साठे फुल्ल करून ठेवण्यात आले असून, कोविड केअर सेंटर (Covid Care Center), डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पिटलचीही (Dedicated Covid Care Hospital) तातडीने उभारणी केली जात आहे. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी साडेचार टक्‍के रुग्ण आयसोलेशन बेड्‌स तर 1.49 टक्‍के रुग्ण ऑक्‍सिजन तर 6.5 टक्‍के रुग्ण व्हेंटिलेटर्सद्वारे उपचार घेत आहेत.

राज्यातील खाटांची सद्य:स्थिती...

  • आयसोलेशन बेड्‌स : 2,55,151

  • ऑक्‍सिजन बेड्‌स : 92,789

  • व्हेंटिलेटर्स बेड्‌स : 11,722

  • एकूण बेड्‌सची संख्या : 3,59,662

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 85.6 टक्‍के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर दीड टक्‍क्‍यांपर्यंतच रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज भासली असून साडेसहा टक्‍के रुग्णांवर व्हेंटिलेटर्सच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत.

- डॉ. प्रदीप आवटे (Dr. Pradeep Awte), राज्य सर्वेक्षण अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग

covid vaccine
भारत सरकारच्या करन्सी नोट प्रेसमध्ये 149 पदांची भरती! 'असे' करा अर्ज

प्रतिबंधित लसीमुळे तीव्रता कमीच

राज्यातील 18 वर्षांवरील नऊ कोटी 14 लाख व्यक्‍तींपैकी जवळपास पावणेसात कोटी व्यक्‍तींनी प्रतिबंधित लस (Covid Vaccine) टोचून घेतली आहे. राज्यात दररोज सरासरी 33 ते 44 हजार रुग्णांची वाढ होत आहे. बहुतेक रुग्णांनी लस टोचून घेतल्याने अधिकाधिक रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्रता दिसून येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोणतीही लक्षणे नाहीत, परंतु त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, त्यांच्यावर त्यांच्याच घरी उपचार सुरू आहेत. परंतु, त्यासाठी त्यांच्या घरात स्वतंत्र राहण्याची सोय, स्वतंत्र स्वच्छतागृह असणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com