esakal | सर्वाधिक ऊस गाळपात सोलापूर जिल्ह्यातील "विठ्ठलराव शिंदे' आघाडीवर ! राज्यात 398.56 लाख क्विंटल साखर उत्पादन
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar

साखर आयुक्तालयाने ऊस गाळपाच्या जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. यंदा राज्यात 91 सहकारी व 88 खासगी मिळून 179 कारखाने सुरू झाले आहेत. या सर्व कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता सहा लाख 81 हजार 530 लाख टन आहे. साखरेचे उत्पादन घटवून अल्कोहोल निर्मितीस प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणास राज्यातील साखर कारखान्यांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे आकडेवारीवरून जाणवत आहे. 

सर्वाधिक ऊस गाळपात सोलापूर जिल्ह्यातील "विठ्ठलराव शिंदे' आघाडीवर ! राज्यात 398.56 लाख क्विंटल साखर उत्पादन

sakal_logo
By
प्रदीप बोरावके

माळीनगर (सोलापूर) : चालू गळीत हंगामात राज्यात 31 डिसेंबर 2020 अखेर 420.39 लाख टन उसाचे गाळप होऊन 398.56 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा साखर उतारा 9.48 टक्के आहे. गाळप व सरासरी साखर उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे कारखान्याने राज्यात सर्वाधिक 8 लाख 32 हजार 187 टन ऊस गाळप केले आहे. 

साखर आयुक्तालयाने ऊस गाळपाच्या जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. यंदा राज्यात 91 सहकारी व 88 खासगी मिळून 179 कारखाने सुरू झाले आहेत. या सर्व कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता सहा लाख 81 हजार 530 लाख टन आहे. साखरेचे उत्पादन घटवून अल्कोहोल निर्मितीस प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणास राज्यातील साखर कारखान्यांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे आकडेवारीवरून जाणवत आहे. अनेक कारखान्यांनी उसाचा रस व बी-हेवी मोलॅसिसपासून अल्कोहोल उत्पादनास प्राधान्य दिल्याने कारखान्यांच्या साखर उताऱ्यात घट झाल्याचे दिसते. परिणामी राज्याचा सरासरी साखर उतारा देखील घटला आहे. 

राज्यातील जिल्हानिहाय साखर उत्पादन 
कोल्हापूर विभागातील 37 कारखान्यांत 96.81 लाख टन उसाचे गाळप होऊन 11.03 टक्के सरासरी साखर उताऱ्याने 106.79 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. पुणे विभागातील 30 कारखान्यात 93.59 लाख टन गाळप होऊन 92.61 लाख क्विंटल, सोलापूर विभागातील 38 कारखान्यात 93.81 लाख टन गाळप होऊन 81.93 लाख क्विंटल, नगर विभागातील 25 कारखान्यात 63.03 लाख टन गाळप होऊन 54.74 लाख क्विंटल, औरंगाबाद विभागातील 27 कारखान्यात 35.24 लाख टन गाळप होऊन 29.08 लाख क्विंटल, नांदेड विभागातील 24 कारखान्यात 33.7 लाख टन गाळप होऊन 30.03 लाख क्विंटल तर अमरावती व नागपूर विभागात अनुक्रमे 2.58 लाख क्विंटल व 0.8 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील 10 सहकारी व 18 खासगी मिळून 28 कारखान्यात 73.95 लाख टन उसाचे गाळप झाले असून 8.72 टक्के सरासरी साखर उताऱ्याने 64.47 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल