

उ. सोलापूर : तालुक्यातील वडाळा येथे अवैध सावकारी करणाऱ्याच्या घरावर उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात पथकाला घरामध्ये विविध व्यक्तींच्या सह्या असलेले २५ कोरे धनादेश, १०० रुपयांचे स्टँपपेपर, व्यवहाराच्या नोंदी असलेल्या वह्या, सोने तारण ठेवून व्याजाने दिलेल्या रकमांच्या नोंदी असलेली डायरी आदी दस्तऐवज आढळून आले. या प्रकरणात त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.