दोन वर्षांपासून गणवेशाची प्रतीक्षाच

सोलापूर विभागातील चार हजार एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा
ST
STsakal

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मागील दोन वर्षांपासून रेडिमेड गणवेश मिळालेले नाहीत. त्यामुळे जुन्या गणवेशावरच त्यांना काम करावे लागत आहे.

कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून एसटी सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नावरदेखील परिणाम झाला होता. गाड्या बंद असल्याने उत्पन्न कमी झाले. आधीच वेळेवर वेतन होत नसल्याने एसटी कर्मचारी हैराण झाले आहेत. त्यातच कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यात आणखी एक भर पडली ती म्हणजे मागील दोन वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना हक्‍काचे गणवेशही मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांना जुन्याच गणवेशावर काम करावे लागत आहे. याबद्दल कर्मचाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे. सोलापूर विभागात जवळपास चार हजार कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांच्या गणवेशासाठी पूर्वी कापड दिले जायाचे. यातून कर्मचारी गणवेश शिवून घेत असत. मात्र मागील काही वर्षांपासून गणवेशात बदल करीत कर्मचाऱ्यांना त्यांच्या मापानुसार गणवेश शिवून देण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. परंतु, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पूर्वी रेडिमेड कपडे देण्यात आले, त्याचा फिटिंगचा खर्च कर्मचाऱ्यांना पदरमोड करून करावा लागत आहे. एसटी कर्मऱ्यांच्या गणवेशासाठी लाखो रुपये खर्च केले जात असूनदेखील चांगल्या दर्जाचे गणवेश मिळत नसल्याच्याही तक्रारी ऐकावयास मिळत आहेत.

ST
T20 WC : पाकिस्तानची विजयी हॅटट्रिक, अफगाणिस्तानने संधी गमावली!

ठळक बाबी

  • चार हजार कर्मचाऱ्यांना मिळाला नाही गणवेश

  • जुन्याचा गणवेशावर करावे लागते काम

  • दोन वर्षांपासून मिळेना हक्‍काचा गणवेश

  • कर्मचारी वर्गातून व्यक्‍त होतेय नाराजी

"मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे कारण सांगत कर्मचाऱ्यांना गणवेश मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचारी जुन्या गणवेशावरच काम करीत आहेत. कर्मचाऱ्यांना शिलाई व गणवेशाचा खर्च देण्यात यावा. त्यामुळे त्यांना हव्या त्या पध्दतीने गणवेश शिवून घेतील."

- श्रीकांत शड्डू, विभागीय सचिव, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस, इंटक, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com