
मोडनिंब: कर्मयोगी भक्त संत शिरोमणी सावता महाराज यांच्या भेटीसाठी निघालेल्या पांडुरंगाच्या पालखीचे अरण नगरीत आगमन झाले. महाराष्ट्रातून शेकडो दिंड्या, पालख्यांसह वैष्णवांचा मेळा पंढरपुरात हजेरी लावत असतो. परंतु कर्मयोगी सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याला प्रत्यक्ष विठ्ठल धावून येत असल्याने सावता महाराजांनी पेरलेला भक्तीचा मळा भाविकांनी फुलून गेला आहे. अरण येथे श्री पांडुरंगाच्या पालखीचे स्वागत सरपंच सुरत्नप्रभा ताकतोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, शिवाजीराजे कांबळे, सावतेबुवा ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल गाजरे, सचिव ॲड. विजय शिंदे, उपसरपंच वसंत इंगळे यांच्याहस्ते करण्यात आले.