सोहळ्यासोबत वारकऱ्यांची चारचाकी, सहा चाकी अशी सुमारे दहा हजार वाहने धर्मपुरी येथील पालखी महामार्गाच्या टोल नाक्यावरून सोलापूर जिल्ह्यात येत असताना ज्या वाहनांचे फास्ट टॅगमध्ये आगाऊ रक्कम आहे, अशा फास्ट टॅगमधून चारचाकी वाहनांची ६५ रुपये इतकी रक्कम कापून घेतली.
Toll Exemption Denied to Warkaris’ Vehicles; Anger Against Govt GrowsSakal
नातेपुते : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आषाढी वारीसाठी राज्यातून श्री क्षेत्र पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी जाहीर केली. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी न झाल्याचे दिसून आले.